Special Report Udayanraje Bhosale | मुलींची पहिली शाळा कोणी सुरु केली? उदयनराजेंच्या वक्तव्यामुळे वाद
देशात मुलींची पहिली शाळा कोणी सुुरु केली
असा प्रश्न विचारला तर तुम्ही उत्तर द्याल महात्मा ज्योतिबा फुले किंवा फुले दाम्पत्य..
ही शाळा कुठे सुरु झाली असं विचारलं तर तुम्ही म्हणाल पुण्याच्या भिडे वाड्यात..
भाजपचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांचं मात्र वेगळं मत आहे..
फुले जयंतीचं औचित्य साधत उदयन महाराज भिडे वाड्यासमोर बोलले आणि त्यांनी स्त्री शिक्षणाचं श्रेय थोरले प्रतापसिंह महाराज भोसले यांना दिले..
त्यावरुन फुले विरुद्ध भोसले या वादाला सुरुवात झाली आहे
काय घडलं नेमकं, पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट..
सातारचे खासदार.. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज.. उदयनराजे भोसले.. हे जेव्हा केव्हा बोलतात.. तेव्हा वाद तरी होतो किंवा चर्चा तर हमखास होतेच.. आज महात्मा फुले जयंती, भिडे वाड्यात जिथे फुले दाम्पत्यानं मुलीची पहिली शाळा सुरु केली अशी मान्यता आहे तिथे अनेक राजकारणी भेट देत होते.. उदयन महाराजसुद्धा भिडे वाड्यात पोहोचले... महात्मा फुलेंना अभिवादन केलं...आणि वेगळाच मुद्दा उकरून काढला... स्त्री शिक्षणासाठी देशातली पहिली शाळा प्रतापसिंह महाराज भोसले यांनी सुरू केली होती असा इतिहास उदयनराजेंनी सांगितला आणि वादाला तोंड फुटलं